BJP Politics Over Hindutva Saam Tv
Video

BJP Politics: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली; पाहा VIDEO

BJP Politics Over Hindutva: राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. यादरम्यान भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहे.

Rohini Gudaghe

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. या निवडणुकीसाठी भाजपची देखील रणनिती ठरल्याचं दिसत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात भाजप आक्रमक होणार असल्याचं समोर आलंय. लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहादच्या मुद्द्यांवर भाजप आक्रमक होणार असल्याची माहिती मिळत आहे. संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदुंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. धारावीतल्या अरविंद वैश्य याची हत्या आणि उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीची हत्या या दोन्ही मुद्द्यावर देखील भाजप अधिक आक्रमक होणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हिंदू मतदारांमध्ये देखील भाजपकडून जनजागृती केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. मागील काही दिवसांपासून भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मुस्लीम मतदारांची मतं कमी प्रमाणात मिळाली आहेत. त्यामुळे आता विधानसभेसाठी भाजप आणि संघ हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेवून जाताना दिसत आहे. उद्या देखील चेंबुरमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT