pratap sarnaik  Saam Tv
Video

Pratap Sarnaik: एसटीत ठाण मांडण्याचा खेळ संपला, मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बसणार आळा! सरनाईकांनी दिले बदलीचे आदेश, VIDEO

End of Monopoly in ST: एसटी महामंडळात अनेक वर्षांपासून अधिकारी हे एकाच ठिकाणी आपली खुर्ची गरम करून बसलेले असतात, यामुळे त्यांचे अनेकांसोबत हितसंबंध होऊन कर्मचाऱ्यांवर अन्याय व्हायचा. असा आरोप अनेक संघटनांनी केला होता. या विषयावर आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक आयोजित केली होती.

Omkar Sonawane

एसटी महामंडळात एकाच मुख्यालय तीन वर्षांपेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांचे तातडीने इतर ठिकाणी बदली करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आणि प्रश्नांसंदर्भात बोलवलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. अनेक वर्षांपासून एसटी विभागातील अनेक अधिकारी हे एकाच मुख्यालयात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी जवळचे संबंध झाले आहेत. त्यातून ते इतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा परिणाम एसटी प्रशासनाच्या कामावर होत आहे. त्यामुळे इथून पुढे आता एकाच मुख्यालयात कोणताही अधिकारी तीन वर्षापेक्षा जास्त काळ आपला कार्यकाळ करू शकणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT