st workers saam tv
Video

ST Bus : एसटी कर्मचाऱ्यांना पगार अर्धाच मिळणार; पैशांचा ठणठणाट, आर्थिक चटके बसणार|VIDEO

ST employees Salary Cut: एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात अर्धाच पगार मिळणार आहे, आधीच कर्मचाऱ्यांचे हाल चालू असताना पुन्हा एकदा सरकारने त्यांच्या पोटावर पाय दिल्याचे दिसत आहे.

Omkar Sonawane

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्याचा वेतन फक्त 56 टक्केच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50 टक्के पगार मिळणार आहे.

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला सुमारे 277 कोटी रुपयांची आवश्यकता असते. मात्र राज्य सरकारकडून फक्त 272 कोटींचा निधी मिळाल्याने संकट निर्माण झालं आहे. त्यातच मिळालेल्या निधीपैकी 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार आहे.

या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पगाराच्या वेळोवेळी होणाऱ्या कपातीमुळे त्यांच्या रोजच्या गरजा भागवणंही कठीण झालं आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT