ST Bus Accident Palghar saam tv
Video

५० प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसचे चाक निखळले; अर्धा किमी पुढे गेल्यानंतर दुसरा टायरही फुटला, VIDEO

Palghar ST Bus Accident : भरधाव एसटी बसचा मागचा चाक अचानक निखळला. तरीही अर्धा किलोमीटर बस मागच्या एका चाकावरच धावली. पुढे दुसरा टायरही फुटला. चालकाच्या प्रसंगावधानामुळं मोठा अपघात टळला आणि ५० प्रवासी बचावले.

Nandkumar Joshi

फय्याज शेख | साम टीव्ही

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जव्हार आगाराच्या बसचे चाक अचानक निखळले. ही बस ठाण्याहून जव्हारकडे जात होती. चाक निखळल्यानंतर बस तब्बल अर्धा किलोमीटर मागील चाकावर धावत राहिली. पुढे दुसरे चाकही फुटले. बसचालकाने प्रसंगावधान राखून बस सुरक्षितरित्या थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये ५० प्रवासी होते.

ठाण्याहून जव्हारकडे निघालेली जव्हार आगाराची एसटी बस वाडा-भिवंडी महामार्गावरील नेहरोली परिसरात पोहोचली. अचानक बसचे मागील एक चाक निखळले. चालक आणि वाहकाच्या ही बाब लगेच लक्षात आली नाही. बस अंदाजे अर्धा किलोमीटरपर्यंत धावत होती. मागच्या एका चाकावरच बस धावली, असे प्रवाशांनी सांगितले.

पुढे गेल्यानंतर बसचे दुसरे चाक देखील फुटले. त्यामुळे बस अनियंत्रित होण्याच्या स्थितीत होती. चालकाने प्रसंगावधान राखून बस सुरक्षितपणे थांबवल्याने मोठा अपघात टळला. बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक असे ५० प्रवासी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी स्पेनमधील एक कुटुंब मुंबईत आलं

Sugar Free Drink For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी 5 शुगर फ्रि ड्रिंक, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Ganesh Chaturthi 2027: पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार, तारिख आत्ताच लिहून घ्या

7 Best Vegetables for Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी आवर्जून खाव्यात ‘या’ 7 भाज्या; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Vanita Kharat: वनिता खरातचा जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन; तब्बल २४ किलो वजन केलं कमी

SCROLL FOR NEXT