Massive Fire at Lote MIDC Saam TV News
Video

Ratnagiri : रत्नागिरीत अग्नितांडव, एमआयडीसीत कंपनीला भीषण आग|VIDEO

Massive Fire at Lote MIDC : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत मध्यरात्री भीषण आग लागली. स्फोटांसारखे आवाज ऐकू येत होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सकाळी ६ वाजता आग आटोक्यात आली.

Namdeo Kumbhar

Massive Fire at Lote MIDC Chemical Factory in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात एका रासायनिक कंपनीत भीषण आग लागली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग इतकी भीषण होती की, ती परिसरातील इतर कंपन्यांपर्यंत पसरली. आगीमुळे कंपनीतील रासायनिक पदार्थांमुळे स्फोटांचा आवाज ऐकू येत होता. आवाजामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकले नसले, तरी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवण्याचे प्रयत्न रात्रभर सुरू होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar: सातासमुद्रापार चंद्राच्या नृत्याविष्काराचा डंका; अमृता खानविलकरच्या लावणींची फॉरेनर्सना पडली भुरळ

Akola Heavy Rain : अकोला जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; गावात नदीचे स्वरूप, पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या अंगावर पत्ते उधळण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न

Egg: अंडं व्हेज की नॉनव्हेज? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Ova Benefits: ओवा खाण्याची योग्य पद्धत कोणती? कोमट पाणी की नुसता ओवा?

SCROLL FOR NEXT