Marathwada Rain News Saam TV
Video

Rain in Maharashtra : मराठवाड्यात आभाळ फाटलं! अनेक जिल्ह्यांमध्ये धडकी भरवणारा पाऊस, पाहा VIDEO

Marathwada Rain News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. पावसामुळे नद्या-नाले तुडूंब झाले असून रस्त्यांना नद्याचं स्वरुप आलंय.

Satish Daud

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात पावसाचा जोर वाढला असून मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. पावसामुळे नद्या-नाले तुडूंब झाले असून रस्त्यांना नद्याचं स्वरुप आलंय. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय.

मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. संभाजीनगर जिल्ह्यातील, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात विक्रमी पाऊस झालाय.

नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. बीड जिल्ह्यात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस होत असून परळीसह परिसरात अनेक नद्यांना पाणी आले आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT