Maharashtra Politics Saam Tv
Video

Maharashtra Politics : वरळी विधानसभेत यंदा तिहेरी लढत होणार? आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीचा उमेदवार कोण, पाहा VIDEO

Vidhan Sabha election mahayuti candidate against Aditya Thackeray : वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला असल्याचं दिसतंय. अजित पवार गटाच्या उमेदवाराचं नाव चर्चेत आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. आता आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? हा प्रश्न सर्वांना होता. यावर आता आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला आहे, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण आहे, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये अमोल मिटकरी हे संभाव्य उमेदवार, अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत. तर मनसेकडून संदीप देशपांडे रिंगणात उतरणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आता तिहेरी लढत पाहायला मिळणार का? अशी जोरदार सध्या चर्चा सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांचे बॅनर लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. वरळीत यंदा विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार, हे मात्र नक्की आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT