Thackeray faction saam tv
Video

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकांआधीच महाराष्ट्राचं राजकारण फिरलं; ठाकरे गट-मनसे आले एकत्र|VIDEO

Political Alliance Brewing: एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये मनसे कार्यालयात आज सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते, यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील या प्रसादाचा लाभ घेतला.

Omkar Sonawane

तबरेज शेख, साम टीव्ही

महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयात सत्यनारायण पूजेला ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली आहे. यामुळे सर्वांच्याच राजकीय भुवया उंचवल्या आहेत.

नाशिकच्या ठक्कर बाजार येथे मनसेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. काही दिवसांपासून या कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम चालू होते. हे काम पूर्ण झाल्यावर आज याच कार्यालयात नवचडी आणि सत्यनारायण पूजेचे आयोजन केले आहे. या ठिकाणी नाशिकच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी हे राज आणि उद्धव ठाकरे यांची फोटो फ्रेम घेऊन तेथे आले. यामुळे काही दिवसांनी वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT