Suresh Dhas  Saam Tv
Video

Suresh Dhas : विधानसभेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कोणामुळे मतं मिळाली? सुरेश धसांनी नावच सांगितलं..

Suresh Dhas Statement : आमदार सुरेश धस आज धाराशिवमध्ये होते. धाराशिवमध्ये एका कार्यक्रमामध्ये सुरेश धस यांनी घड्याळ आणि बाण असा उल्लेख करत मोठं वक्तव्य केले. धस काय म्हणाले? जाणून घ्या..

Yash Shirke

'देवेंद्र फडणवीस सच्चे आहेत, ईमानदार आहेत त्यांच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे या प्रमुख भावनेमुळे लोकांनी आमच्यासोबत घड्याळ आणि धनुष्यबाण देखील निवडून दिले', असे विधान आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

बीडचे आमदार सुरेश धस यांनी धाराशिवच्या परंडा येथील एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण आणि अजित पवार यांच्या घड्याळाला निवडून दिले असे विधान केले आहे. ते म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे पाहून भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. त्यासोबत घड्याळ आणि धनुष्यबाणालाही लोकांनी मत दिले. नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मत दिले असते का? धनुष्यबाण (एकनाथ शिंदे) आणि आमची (भाजप) जुनी दोस्ती, पण एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण देखील फडणवीसांमुळे निवडून आला' महाराष्ट्रात कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता म्हटलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवतात असे म्हणत सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्याचे कौतुक देखील केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT