Pratap Sarnaik Meet Sanjay Raut Saam Tv
Video

Political News: मोठी बातमी! शिंदेंच्या मंत्र्याने घेतली संजय राऊतांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pratap Sarnaik Meet Sanjay Raut: शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आले आहेत.

Priya More

मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेटी घेतली. संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी संजय राऊत, त्यांचे भाऊ सुनील राऊत आणि आई यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीचे फोटो समोर आले असून ते व्हायरल होत आहे. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी भेटीमागचे कारण सांगितले. 'संजय राऊतांना नाही तर आईला भेटायला मी आलो होतो.', असे ते म्हणाले.

संजय राऊत यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक म्हणाले की, 'प्रताप सरनाईक हे राऊत कुटुंबामधील एक भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संजय राऊत यांच्या आई मला लाडू बनवून देतात. मी जर आलो नाही तर आई सुनील यांना सांगते की फोन करून त्याला बोलावून घे. आता मी दोन वर्षांनंतर आलो आहे. आईचा अपघात झाला होता त्यावेळी मी फोन केला होता. तिला सांगितले होते की मी दिवाळीत येईल. पाडव्याच्या दिवशी मी येईल असे आईला सांगितले होते. त्यानुसार मी आज आलो आहे.' तसंच, आमच्यात राजकीय चर्चा काय झाली हे मी शिंदेसाहेबांना सांगणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, माझ्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत शिंदेसाहेब तर मी त्यांना नक्कीच सांगणार आहे. मी इकडे येताना त्यांना सांगितले होते की मी आईला भेटायला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना दुष्काळातून सुखरुप बाहेर काढू - मुख्यमंत्री फडणवीस

8th Pay Commission : मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ, तारीख समोर

Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी फळे खावीत का? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Lung Health : गूळ आणि तुळस खाल्ल्याने फुफ्फुसे मजबूत होतात? जाणून घ्या सत्य

गोकुळसाठी महायुतीचा ठरला फॉर्म्युला; १ वर्ष भाजपला, शिवसेना-राष्ट्रवादीला किती वर्षे अध्यक्ष मिळणार?

SCROLL FOR NEXT