Shetkari Nete Ravikant Tupkar  Saam Tv
Video

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर जाणार, आंदोलन करणार; रविकांत तुपकर काय म्हणाले, पाहा VIDEO

Shetkari Nete Ravikant Tupkar On Farmers issue : शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : नागपूर येथे २० ऑगस्ट रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचलाय. राज्यामधील शेतकरी-शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झालीय. याला केंद्र आणि राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केलाय.

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाणार आहोत, त्यांना शेतकरी आत्महत्या कसा करतो? याचं प्रात्यक्षिक दाखवणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यापूर्वी देखील रविकांत तुपकर यांनी मुंबईत आंदोलन केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचं दिसतंय. दरम्यान पोलिसांनी त्यांना वर्षा निवासस्थानी आंदोलन करू नये, म्हणून नोटीस बजावलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT