Rajkot Fort Rada Saam Tv
Video

Rajkot Fort Rada : राजीनामा द्या... मालवण राड्यानंतर संजय राऊत संतापले, पाहा VIDEO

Sanjay Raut On Rajkot Shivaji Maharaj Statue Issue : मालवणमध्ये झालेल्या राड्यानंतर संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर टीका केलीय. पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला गेलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. शिवरायांचा पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. तेच पैसे निवडणुकीत वापरलेले आहेत, असा आरोप देखील त्यांनी केलाय. राऊतांनी थेट देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं नाव घेत सरकारवर घणाघात केलाय.

याप्रकरणी आंदोलनं करून काही होणार नाही, तर राजीनामे द्या. अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केलीय. काल झालेल्या राड्यावरून त्यांनी गृहखात्यावर खोचक टीका केलीय. मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर काल झालेला प्रकार महाराष्ट्राच्या गृह खात्यावर थुंकण्याचा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी केलीय. शिवाजी महाराजांच्या संदर्भात भाजपचं कृत्य नीच असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारविरोधात महाविकास आघाडीचं जोडेमार आंदोलन १ तारखेपर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : घरातील 'हे' पदार्थ खाल्याने केस होतील मुळापासून मजबूत, जाणून घ्या

Samir Choughule : समीर चौघुलेचा आनंद गगनात मावेना, कॉमेडी King 'या' पुरस्काराने सन्मानित, प्राजक्ता माळीने केलं खास कौतुक

Crime : महाराष्ट्राच्या लेकीची भोपाळमध्ये हत्या; प्रियकराने कुटुंबाच्या मदतीने रचला क्रूर कट; लोखंडी पेटीतून बाहेर आलं संतापजनक वास्तव

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५८,८०० होणार

SCROLL FOR NEXT