Maharashtra Politics Maharashtra Politics
Video

Maharashtra Politics : काकाच्या विरोधात पुतण्या, कोकणात आता कदम घराण्यात राजकीय संघर्ष!

Ramdas kadam : दापोली विधानसभेत कदम यांना कदमांचेच आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

महाराष्ट्राच्या राजकारणात काका आणि पुतण्याच्या लढाई नवीन नाहीत. आता यात आणखी एक भर पडली आहे. कोकणात कदम कुटुंबात राजकीय लढाई सुरु होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांच्याविरोधात त्यांच्या पुतण्याने दंड थोपाटले आहेत. रामदास कदम यांचा पुतण्या अनिकेत कदम यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तो आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंसाठी काम करणार आहे. त्यामुळे कोकणाच्या राजकरणात कदम कुटुंबियांची जोरदार चर्चा सुरु आहे.

अनिकेत कदम आगामी विधानसभेला दापोली मतदारसंघात चुलत भावाविरोधात प्रचार करणार आहे. खेडमध्ये अनिकेत कदम यांच्या वाढदिवसाचे उबाठाकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आले. अनिकेत कदम हे विद्यमान आमदार योगेश कदम यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत.

घरगुती वाद आता राजकारणपर्यंत पोहचल्याचं समोर आलेय. अनिकेत कदम हे उद्योजक सदानंद कदम यांचे सुपुत्र आहेत.

दापोली विधानसभेत कदम यांना कदमांचेच आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT