Ramdas Athawale On Raigad Politics Saam Tv
Video

Maharashtra Politics : रायगड पालकमंत्री वादात रामदासांची उडी, तटकरेंना सोडा, गोगावलेंना जाऊ द्या; मंत्रीपद आमच्याकडे द्या..

Ramdas Athawale : शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीतल्या दोन्ही पक्षांमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Yash Shirke

Ramdas Athawale On Raigad Politics : रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत चढाओढ सुरू आहे. असे असताना 'मुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेऊन हा तिढा लवकर सोडवतील. जर हा प्रश्न सुटत नसेल तर राज्यात जे एक मंत्री पद रिक्त आहे ते आर पी आय देऊन रायगडचे पालकमंत्रीपद देखील आम्हाला मिळावे' अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

'पालकमंत्रीपदावरुन अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात वाद सुरु आहे. भरत गोगावले मंत्री आहेत. ते आधी मंत्रीपदासाठी आग्रही होते. त्यांना मंत्रीपद मिळाले आहे. आता पालकमंत्रीपद मिळावं असा त्यांचा आग्रह आहे. आदिती तटकरी यापूर्वी पालकमंत्री होत्या. राष्ट्रवादी पक्षाला इतर ठिकाणी पालकमंत्रीपद मिळाले नसल्याने रायगडमध्ये पालकमंत्रीपद मिळायला हवी अशी सुनील तटकरे यांचा भूमिका आहे. हा वाद मुख्यमंत्री मिटवतील अशी मला अपेक्षा आहे. पण वाद मिटत नसेल, तर रिक्त मंत्रीपद आरपीआयला मिळावं आणि रायगडचे पालकमंत्रीपदही आम्हाला मिळावे' असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT