Maharashtra Politics  Saam Tv
Video

Maharashtra Politics: लातूरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ; 'कमळ' घेणार हाती

Latur Politics: लातूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि प्रहार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली. आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More

लातूर शहरातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि प्रहार पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार गट आणि प्रहार पक्षाला रामराम ठोकला. आज हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार असून ते कमळ हाती घेणार आहे. चाकूर तालुक्यातल्या १५० कार्यकर्त्यांचा आज मुंबई येथे भाजपात प्रवेश केला जाणार आहे.

लातूरच्या चाकूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि चाकूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष यांच्यासह १५० कार्यकर्त्यांचा आज मुंबई येथे भाजपात प्रवेश होणार आहे. तर आज चाकूरमधून ७० ते ८० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झालाय. दरम्यान या प्रवेशामुळे चाकूर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि प्रहार पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे. तर आज सकाळी या कार्यकर्त्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT