मुंबई : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून आता महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. जर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सत्तेतून खाली खेचायचे असेल, तर महाविकास आघाडीला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा लागेल, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतल्याचं समोर आलंय. मात्र याबाबत निर्णय विधानसभा निवडणुकीनंतरच घेवू अशी भूमिका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतल्याचं समजत आहे.
दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच पुढील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचं स्पष्ट केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मलिकार्जून खरगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट करावा अन् एकत्रित निवडणूक लढवावी असं सांगितलं होतं. परंतु, आता महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.