BJP Leader Jagdish Mulik Criticized Sunil Tingre Saam Tv
Video

Maharashtra Politics : विधानसभेच्या तोंडावर महायुतीत वादाची ठिणगी? भाजप कार्यकर्त्याचे गंभीर आरोप, VIDEO

BJP Leader Jagdish Mulik Criticized Sunil Tingre : पुण्यात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे. भाजप नेत्याने काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका केलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : विधानसभेच्या तोंडावर पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचं चित्र समोर आलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वडगाव शेरीमध्ये होणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनावरून जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका केलीय. राष्ट्रवादीचे आमदार श्रेय लाटत आहेत, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केलाय.

आमदार सुनील टिंगरे यांच्यावर भाजप नेते जगदीश मुळीक यांनी टीका केलीय. पुण्यातील वडगाव शेरी भागात महायुतीचा धर्म भाजपाने शिवसेनेनेच पाळायचा का? असा संतप्त सवाल देखील मुळीक यांनी विचारला आहे. विकास कामांचा पाठपुरावा महायुतीतील सगळ्या पक्षांनी केलाय. पण त्यांचा साधा फोटो का टाकला नाही, असा प्रश्न भाजप कार्यकर्ते जगदीश मुळीक यांनी विचारलाय. त्यामुळे महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT