Deuty CM Eknath Shinde Saam Tv
Video

Eknath Shinde: प्रचारासाठी एकनाथ शिंदेंची धावाधाव, गाडीतून उतरत स्टेज गाठले; पाहा VIDEO

Maharashtra Local Body Election: स्थानक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्वच नेते व्यस्त आहेत. प्रचारसभांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धावाधाव सुरू आहे. सांगलीतील सभेला पोहचण्यासाठी ते पळत सुटले. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

नगरपरिषद निवडणुकीत प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावाधाव करत असल्याचे रात्री विटामधील सभेत दिसून आले. विटानगर परिषदेच्या प्रचार सभेत प्रचाराची १० वाजताची वेळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल झाले. शिंदे यांनी धावत स्टेजवर जात वेळ संपल्याने अवघे काही मिनिटं उपस्थितासमोर भाषण केले. 'सभेला यायला वेळ झाला, पण लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना भेटण्यासाठी मी वेळ काढून आलोच. लाडक्या बहिणीने विधानसभेत इतिहास घडवलाय तसाच इतिहास विटा, आटपाडीमध्ये निवडणुकीत दिसून येईल. नगर विकास खात्याच्या माध्यमातून विटा शहरासाठी मोठा निधी दिला, अजूनही निधी कमी पडू देणार नाही.' असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिली. विटा नगरपरिषद आणि आटपाडी नगरपंचायतीवर भगवा फडकवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. आता वेळ संपल्यावर केलेल्या या भाषणावर निवडणूक आयोग आणि विरोधक काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निम्न पैनगंगा प्रकल्प धरण विरोधी यवतमाळमध्ये दगडफेक

Maharashtra : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ पोलिसांची मोठी कामगिरी; ८९ लाख बक्षीस असलेले ११ नक्षलवादी सरेंडर

Skin Care: ड्रायनेसमुळे चेहरा डल पडलाय? मग 'या' फळाच्या घरगुती फेसपॅकने मिळेल नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्टो स्किन

Idli Manchurian: उरलेल्या इडल्या फेकून देताय? करा कुरकुरीत शेजवान इडली मंचुरियन, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Kala Vatana Rassa Bhaji Recipe: मालवणी स्टाईल काळ्या वटाण्याची रस्सा भाजी घरी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT