Maharashtra Politics Saam Tv
Video

Maharashtra Politics : अजित पवार गटाकडून नाराज नेत्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू; मुंबईत बैठक होणार, पाहा VIDEO

Ajit Pawar Group Leader Of Vidarbha Meeting : मुंबईत अजित पवार गटाच्या नाराज नेत्यांची बैठक होणार आहे. गणेशोत्सवानंतर ही बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

मुंबई : विदर्भातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाराज जिल्हाध्यक्षांना मुंबईत बोलावलं आहे. नागपुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत विदर्भातील जिल्हाप्रमुखांनी मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला होता. पक्षाचे मंत्री जिल्हा प्रमुखांची कामे करत नाही तसेच सरकारी समित्यांमध्ये स्थान देत नसल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला होता. विदर्भातील या जिल्हाप्रमुखांची नाराजी पक्ष नेत्यांपर्यंत पोहोचली असून त्यांना मुंबईत येण्यास सांगितले आहे.

पक्षाने गणेश उत्सवानंतर सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबईत बोलावलं आहे. विधानसभेच्या तोंडावर नाराज नेत्यांची अजित पवार गटाकडून मनधरणी केली जात असल्याचं दिसत आहे. नेत्यांनी तक्रार केल्यानंतर आता पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेतली असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच आता अजित पवार गटाच्या नाराज नेत्यांची बैठक मुंबईत होणार आहे, या बैठकीत नेमकं काय होतंय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT