Governor Appointed 12 MLAs  Saam Tv
Video

Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती ऑगस्टमध्ये होणार

Governor Appointed 12 MLAs: राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत मोठी बातमी समोर आलीय. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त असलेल्या या 12 जागा विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरल्या जाणार आहेत. या आमदारांची नियुक्ती येत्या ऑगस्ट महिन्यात केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी साम टीव्हीला दिलीय. दरम्यान या आमदारांच्या नियुक्त्यांवरुन महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यात चांगलाच वाद झाला होता. आता या आमदारांची नियुक्ती ऑगस्ट महिन्यात केली जाणार आहे. भाजप ६, शिवसेना शिंदे गट -३, अजित पवार गट राष्ट्रवादी तीन आमदारांची नियुक्ती होणार आहे. दरम्यान मविआ सरकार असतानांच १२ आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे दिली होती. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्याबाबत कोणताच निर्णय घेतला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT