राज्य सरकारनं २८२ अग्निवीरांना महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई म्हणून नियुक्त केले आहे.  saam TV
Video

Agniveer Job : आनंदाची बातमी! २८२ अग्निवीरांना पोलीस दलात नोकरी

Maharashtra Government Approves Jobs for 282 Navy Agniveers : अग्निवीरांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारनं २८२ अग्निवीरांना पोलीस दलात शिपाई म्हणून नियुक्त केले आहे.

Nandkumar Joshi

गणेश कवडे, मुंबई | साम टीव्ही

देशाच्या सीमेवर लढणाऱ्या अग्निवीरांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं घेतला होता. त्यानुसार, नियमात आवश्यक बदल करून २८२ अग्निवीरांना नियुक्ती देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलात शिपाई म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तसे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या २८२ नौदल अग्निवीरांची पहिली यादी राज्य सरकारला देण्यात आली होती. त्यानुसार, १५० खलाशी डेकसाईड आणि १३२ खलाशी इंजिनसाईड अशा २८२ अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस शिपाई म्हणून नियुक्त झालेल्या अग्निवीरांना शुभेच्छाही दिल्या.

याबाबत फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील अग्निवीर आपला कार्यकाळ संपवून परत येतील, तेव्हा अग्निवीरांना महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असेल, तर आम्ही त्यांना सामावून घेऊ. या जवानांनी सीमेवरसुद्धा काम केले आहे. प्रचंड क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पहिल्यांदा नौदलाची बॅच आलेली आहे आणि त्यांना पोस्टल पोलीसमध्ये आम्ही घेतले आहे. पोस्टल पोलीसमध्ये सातत्याने कॅपॅसिटी बिल्डिंग तयार करणे गरजेचे होते. अडीचशे पेक्षा जास्त अग्निवीर पोस्टल पोलीसमध्ये आल्यामुळे सागरी सुरक्षा करण्याकरिता अत्यंत प्रशिक्षित मनुष्यबळ आम्हाला मिळाला आहे. नियमांमध्ये काही बदल करायचा असेल, तर बदल करून सर्वांना सामावून घेतले आहे. सरळ भरती होती. चाचणीची आवश्यकता नव्हती. चाचणी करून, शारीरिक चाचणीनंतर ते सैन्यात गेलेले आहेत. त्यामुळे थेट नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड रेकॉर्ड होणार

Unique Village : ना रस्ते, ना ट्रॅफिक, ना गाड्या! परीकथेतल्या गावासारखं सुंदर ठिकाण, जिथे लोक बोटीतून करतात प्रवास

राज्यात औषध विक्रेत्यांवर तुकाराम मुंढेंची कारवाई; ७१ परवाने निलंबित, २९ रद्द; नाशिकमध्येही 11 लाखांचा मसाला जप्त

Saree Draping Styles: कॉलेजपासून पार्टीपर्यंत दिसा स्टायलिश! या ७ साडी ड्रेपिंग स्टाइल्स करतील तुमचा लूक खास

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! DA मध्ये ५% वाढ, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये एरियर

SCROLL FOR NEXT