Maharashtra Nurses Strike Saam TV
Video

Maharashtra Nurses Strike : आरोग्य यंत्रणा ठप्प होणार? नर्सचा संपाचा इशारा | VIDEO

Nurse Protest In State Government Hospitals : राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत सुमारे ३० हजार परिचारिका १८ जुलैपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत सुमारे ३० हजार परिचारिका १८ जुलैपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाणार आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या परिचारिकांची उपेक्षा हे या संपाचं मुख्य कारण आहे. त्यांच्या सेवाशर्ती, वेतनवाढ, कायम स्वरुपाची नोकरी या बाबी सरकारकडून दुर्लक्षित केल्या जात असल्याचा परिचारिकांचा आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर १५ आणि १६ जुलै रोजी परिचारिका मुंबईतील आझाद मैदानात धरणं आंदोलन करणार आहेत. त्यानंतर १७ जुलैला एक दिवसाचा संप करण्यात येणार आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्यास १८ जुलैपासून संपूर्ण राज्यातील ३० हजार परिचारिका अनिश्चित काळासाठी संपावर जाणार असल्याचं संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT