Ladaki Bahin Yojana  Agrowan
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! दोन दिवसांत खात्यात येणार पैसे

Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : दोन दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली.

Namdeo Kumbhar

MMaharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दोन दिवसांमध्ये लाडक्या बहि‍णींचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लाडक्या बहि‍णींचे पैसे दोन दिवसात खात्यामध्ये येतील, असे सुतोवाच दिले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींवा खूशखबर दिली.

लाडक्या बहि‍णींना दोन ते तीन दिवसांत डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे माजी मंत्री मुनगंटीवार यांनी साम टीव्हीसोबत बोलताना सांगितले. लाडकी बहीण योजनासंदर्भात सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेय. निकष बदलले जाणार, काही महिला अपात्र ठरणार, यासारख्या चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. त्यासंदर्भात मुनगंटीवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील दोन दिवसांत १५०० रूपये खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आलेय.

लाडकी बहीण योजनांचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहेत. या संदर्भात मी अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. ही योजना कुठेही बंद पडणार नाही. या विरोधात काँग्रेसपक्ष कुठे चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असतील तर त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करा. पात्रता आणि निकषांत बदल होणार नाहीत. फक्त अफवा पसरवत आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT