Supriya Sule Mobile phone and whatsapp hacked | सुप्रिया सुळेंचे मोबाइल आणि व्हॉट्सअॅप हॅक झाले असून, हॅकर्सने २०० डॉलर्सची मागणी केली आहे.  SAAM TV
Video

VIDEO | सुप्रिया सुळेंचा मोबाइल, व्हॉट्सअॅप हॅक, बिहारचा हॅकर, २०० डॉलर्सची मागणी

Supriya Sule Mobile Hacked : सुप्रिया सुळे यांचा मोबाइल फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाले असून, त्यांच्याकडे २०० डॉलर्सची मागणी केली आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाइल हॅक करणाऱ्याने 200 डॉलर्सची मागणी केली असून, याप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. सुप्रिया सुळे यांचा मोबाइल आणि व्हॉट्सअॅप काल हॅक झाला होता. या प्रकरणी त्यांनी तक्रार देखील दाखल केली होती. आता या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. सुळे यांच्या खात्यावरून 200 डॉलर्सची मागणी करण्यात आली होती. अकाउंट हॅक करणारा तरूण हा बिहार राज्यातील असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दुसरीकडे, मोबाइल हॅक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोबाइल कुणाचाही हॅक होऊ शकतो. पोलिसांनी मला माहिती दिली आहे की, हॅकची नवीन सिस्टिम आली आहे. मला एक मेसेज आला आणि मी तो ओपन केल्यानंतर तो हॅक झाला. फोन टॅपिंग नवीन नाही, असे त्या म्हणाल्या. (Supriya Sule Mobile Phone and Whatsapp hacked )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोज एक चमचा तूप खाल्ल्याने शरीरात होतात आश्चर्यकारक बदल, जाणून घ्या 5 फायदे

Maharashtra News Live Update: रस्त्याच्या खड्ड्यात शौचालयाचे भांडे ठेवून पुणे पॅंथर सेनेचे अभिनव आंदोलन

Mahila Bachat Gat: महिलांसाठी मोठी बातमी! सुरुवातीला ३० हजार अन् नंतर ६० हजार; बचत गटांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं, सातही धरणांमधील पाणीसाठा वाढला, वाचा ताजी आकडेवारी

Home Cleaning Tricks : बाथरूममधील गोष्टी एक्सपायर्ड डेट संपली म्हणून फेकून देता? जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT