MONSOON ENTERS MAHARASHTRA THROUGH KONKAN, HEAVY RAIN ALERT ISSUED Saam Tv
Video

Maharashtra Monsoon : खुशखबर! कोकणात मान्सून दाखल; 'या' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट

Maharashtra Monsoon Update News : अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यभर मान्सूनचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

Maharashtra Kokan Mosoon Update News संपूर्ण राज्य ज्या क्षणाची वाट पाहत होता. अखेर तो आनंदाचा क्षण आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनला पोषक वातावरण तयार झालं होतं. अखेर अरबी समुद्र, केरळ आणि गोवानंतर मान्सून आता कोकणात दाखल झाला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग (Kokan Sindhudurga Rain Alert) आणि कोल्हापुरातील दक्षिण भागात मान्सून (Kolhapur Monsoon Rain) आला असून पुढील काही दिवसांमध्ये तो राज्यभरात व्यापू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा मान्सून तीन दिवस उशिराने केरळमध्ये (Kerala Heavy Rain Alert) दाखल झाला. १ जूनला केरळमध्ये आल्यानंतर काल म्हणजे शुक्रवारी मान्सून गोवामध्ये (Goa Mosnoon ) दाखल झाला. तिथून पुढे प्रगती करत मान्सून महाराष्ट्रातील कोकणच्या दिशेने आगेकूच केली. इथून पुढच्या दोन दिवसांमध्ये तो राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये व्यापेल. महाराष्ट्रासह माॅन्सून आंध्र प्रदेशातही दाखल झाला आहे. दरम्यान या बातमीने शेतकऱ्यांच्या आनंदात दुप्पट वाढ झाली असून सुगीचे दिवस येणार असल्याची चाहूल लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT