Maratha Reservation SAAM TV
Video

Maratha Andolan : मराठा आंदोलकांवरील ८२६ पैकी केवळ ८६ गुन्हे मागे | VIDEO

Maratha Reservation : गेल्या दोन वर्षांत राज्यभरात मराठा आंदोलनकर्त्यांवर एकूण ८२६ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी केवळ ८६ गुन्हेच मागे घेण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री अनेकदा देत आले आहेत. मात्र, प्रशासकीय प्रक्रियेतील लालफितीमुळे या निर्णयाची अंमलबजावणी अडखळली आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यभरात मराठा आंदोलनकर्त्यांवर एकूण ८२६ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी केवळ ८६ गुन्हेच मागे घेण्यात आले आहेत. दरम्यान, समितीनं गृहमंत्रालयाला ३८ गंभीर गुन्ह्यांवर ज्यामध्ये शासकीय संपत्तीचे नुकसान व पोलिसांवर हल्ल्याचे प्रकार आहेत माघार न घेण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे उर्वरित शेकडो प्रकरणांचं भवितव्य अद्याप अनिश्चित आहे. आता मुख्यमंत्री नेमका कोणता निर्णय घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे, कारण हा मुद्दा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाशी निगडित असल्याने राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तृतीयपंथी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना

२० दिवसांत तिसरा बळी; बिबट्याच्या दहशतीने संतप्त नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन|VIDEO

Bank Jobs: महत्त्वाची बातमी! जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य; ७० टक्के जागा राखीव

मोठी बातमी! अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द, 'ते' वक्तव्य भोवलं|VIDEO

Dakshin Ganga: कोणत्या नदीला 'दक्षिण भारताची गंगा' म्हणतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT