Shivraj Rakshe saam tv
Video

Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे हरला की जिंकला? तुम्हीच VIDEO पाहून ठरवा

Shivraj Rakshe News : अहिल्यानगरमध्ये सुरु असलेल्या कुस्ती स्पर्धेत मोठा राडा झाला. पंचाने चितपट घोषित केल्यानंतर शिवराज राक्षेनी आक्षेप घेतला. यावेळी शिवाराज राक्षेने पंचाला मारहाण केली.

Vishal Gangurde

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार अहिल्यानगरमध्ये सुरु आहे. याच स्पर्धेला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. या कुस्ती स्पर्धेदरम्यान गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारल्याने मोठा राडा झाला.

कुस्ती स्पर्धेतील गादी विभागातील सेमीफायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे या दोन्ही मल्लामध्ये सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात अवघ्या १ मिनिटात शिवराज राक्षे चितपट झाला. मात्र,चितपट झालेल्या शिवराज राक्षेने पंचाला आव्हान दिलं. त्याने पाठ आणि खांदा गादीला टेकला नसल्याचं म्हटलं.त्यामुळे त्याने पंचाचा निर्णय चुकीचा ठरवला. पुढे त्याने रिव्ह्यू घेण्याची मागणी केली. मात्र, पंचाने मागणी फेटाळली. यानंतर रागात त्याने पंचाची कॉलर ओढली. त्यानंतर लाथही मारली. राक्षेचा पराभव झाला की नाही? तुम्हीच व्हिडिओ पाहून ठरवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

Pitru Paksha : ना कांदा, ना लसूण; पितृपक्षात बनवा 'ही' झणझणीत रस्सा भाजी

SCROLL FOR NEXT