Maharashtra IAS transfer during floods Saam TV News
Video

IAS Transfer : शेतकरी राजा संकटात असताना IAS अधिकाऱ्याची बदली, नवी नियुक्ती कुठे?

Maharashtra IAS transfer during floods : महाराष्ट्रात अतिवृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना IAS अधिकारी सोनिया सेठी यांची बदली करण्यात आली आहे. त्या BEST च्या नव्या जीएम झाल्या असून, मदत व पुनर्वसन विभागाची जबाबदारी विनिता वेद सिंगल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया सेठींची बदली करण्यात आली आहे. राज्यात अतिवृष्टीने भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांची बदली करण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आपत्तीच्या काळातच सोनिया सेठींची बदली केल्याने बदलीवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

राज्यात पूरग्रस्त भागातील परिस्थितीची दाहकता फार आहे. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या कार्याची गरज असताना ही बदली कितपत योग्य आहे? का ती शिक्षा आहे? जनता अत्यंत कठीण अवस्थेत असताना विभागात नेतृत्व बदल केल्याने अफरातफरीचे वातावरण निर्माण होणार नाही का? नवीन अधिकाऱ्याला विभागाचे काम समजून घेण्यासाठी वेळ लागणार नाही का? प्रशासन योग्य पध्दतीने चालले नाही याचे हे उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT