Ekanth shinde on holi Saam Tv
Video

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राजकीय रंगांची उधळण; विरोधकांना शुभेच्छा अन् टोलेबाजी, VIDEO

Holi Festival: संपूर्ण राज्यात होळीचा सण उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. राजकीय नेतेदेखील रंगांची उधळण करत एकमेकांना शुभेच्छा देत आहेत

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात कार्यकर्त्यांसोबत रंग खेळत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि राजकीय रंगांची उधळणही केली.

शिंदे म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात धूलिवंदनाच्या दिवशी कार्यकर्त्यांसोबत रंग खेळण्याची परंपरा सुरू केली होती. गणपती, दहीहंडी, दिवाळी आणि होळी हे सण मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा त्यांनी घालून दिली. आज आम्ही तीच परंपरा पुढे नेत आहोत.

यावेळी त्यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच विरोधकांनाही शुभेच्छा देत ते म्हणाले, रंगपंचमीच्या उत्सवामध्ये दोस्त दोस्त के भी गले लगता है, दुश्मन भी दोस्त के गले लगता है, दुश्मन भी दुश्मन के गले लगता है. बुरा ना मानो, होली है! त्यामुळे मी विरोधकांनाही चांगले विचार, सद्बुद्धी लाभो, आणि चांगल्याला चांगले म्हणण्याची बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोअसा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणीच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाच्या सरी; नवी मुंबईसह ठाणे, डोंबिवलीत पाऊस

Sonali Kulkarni: गुलाबी साडी अन् लाली...; सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लुक, पाहा फोटो

Maharashtra Weather Alert: ऐन दिवाळीत पावसाने घातला धुमाकूळ; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Boondi Ladoo Recipe: या भाऊबीजनिमित्त भावाला द्या खास मिठाई; झटपट बनवा हॉटेल स्टाईल बूंदीचे लाडू

SCROLL FOR NEXT