Raigad Fort Latest News Saam TV
Video

Raigad Fort Rain : किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस; धडकी भरवणारा VIDEO समोर

Raigad Fort Latest News : किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला झालाय. यामुळे रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पावसात पर्यटनासाठी आलेले अनेक पर्यटक अडकून पडले होते.

Satish Daud

सध्या राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला झालाय. यामुळे रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पावसात पर्यटनासाठी आलेले अनेक पर्यटक अडकून पडले होते.

पावसाचा जोर कमी होताच या पर्यटकांनी किल्ल्यावरून धूम ठोकली. या पावसाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्या प्रमाणे पावसाचे पाणी कोसळत आहेत.

ही भयानक परिस्थिती रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली आहे. दरम्यान, येत्या काही तासांतच घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कुठलेही स्टंट करून जीव धोक्यात टाकू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfers : प्रशासनात मोठा बदल! ८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुठे कोणाची होणार नियुक्ती? वाचा

Maharashtra News Live Update: करमाळ्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळला.

Rajesh Sharma: शूटिंगदरम्यान चावाला विषारी किडा; प्रसिद्ध अभिनेता राजेश शर्मांची प्रकृती गंभीर, AICWA ने केली चौकशीची मागणी

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, इंजिनिअर्सच्या मागण्या पूर्ण होणार? वाचा सविस्तर...

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

SCROLL FOR NEXT