Chandrashekhar Bawankhule Saam TV
Video

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच करण्यात येणार आहेत. त्यामुळे या पदांसाठी इच्छुक असलेल्यांच्या पदरी तूर्त निराशाच आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध महामंडळांचे अध्यक्ष व सदस्य पदांच्या नियुक्त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच करण्यात येणार असल्याचं स्पष्ट मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. वर्ध्यात भाजपच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात बोलताना त्यांनी हा खुलासा केला. मागील काही महिन्यांपासून या पदांसाठी अनेक इच्छुकांची चर्चा सुरू होती. मात्र, निवडणुकांपूर्वी कोणत्याही नियुक्त्या होणार नसल्याने इच्छुकांना तूर्त निराशा सहन करावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या १४० महामंडळांवर भाजपच्या ७८५ नेते, कार्यकत्यांची नियुक्ती केली जाणार आहे. बावनकुळे यांनी यावेळी महायुतीच्या माध्यमातूनच आगामी निवडणुका लढवल्या जातील, असंही स्पष्ट केलं. त्यामुळे नियुक्त्यांच्या संदर्भातील अंतिम निर्णय या निवडणुकांनंतरच अपेक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT