Elections  saam tv
Video

Local Body Elections : मिनी मंत्रालयाचा धुरळा पहिल्या टप्प्यात, आयोग 'या' दिवशी जाहीर करणार निवडणूक?

Maharashtra Local Body Elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra local body election 2025 dates after Diwali : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ जानेवारी २०२६ च्या आतमध्ये राज्यातील निवडणुका घेण्यासाठी आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पंचायत समिती आणि नगर परिषदेचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून लवकरच मनपाचेही आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्याबाबतच संभाव्य तारीख समोर आली आहे. त्याशिवाय शिक्षकांची इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे, त्यानुसार निवडणुकीच्या तारखांचा अंदाज वर्तवला जातोय.

राज्यातील शिक्षकांची जानेवारीपर्यंत इलेक्शन ड्युटी लावल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीनंतर २७ ते ३१ ऑक्टोबर यादरम्यान आयोगाकडून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. नोव्हेंबर अखेर अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होऊ शकते. तर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर परिषदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

SCROLL FOR NEXT