Maharashtra Driver Germany Jobs Saam TV
Video

Germany Driver Jobs : महाराष्ट्रातील वाहनचालकांना जर्मनीत मिळणार नोकरी, कशी ते पाहा VIDEO

Maharashtra Driver Germany Jobs : महाराष्ट्रातील वाहनचालकांना आता थेट जर्मनीत नोकरी मिळणार आहे. जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यात कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे

Satish Daud

परवानाधारक वाहनचालकांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील वाहनचालकांना आता थेट जर्मनीत नोकरी मिळणार आहे. जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यात कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. त्यानुसार तब्बल 10000 कुशल वाहनचालक जर्मनीला पाठण्यात येणार आहे.

विशेष बाब म्हणजे यातील पहिले1000 वाहनचालक तातडीने पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे.या कामाची सर्व जबाबदारी राज्याच्या परिवहन विभागावर सोपविण्यात आली आहे. पुण्यातील ‘आयडीटीआर’ या संस्थेत वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यात येईल त्यासाठी चालकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.

जर्मनीत ड्रायव्हर जॉबसाठी अटी

  • वाहनचालकांकडे जड वाहने चालविण्याचा परवाना आवश्यक

  • तसेच त्याला जर्मन भाषा लिहिता व बोलता यायला हवी. यासाठी सरकार प्रशिक्षण देईल.

  • वाहनचालकाची शारीरिक तसेच मानसिक स्थिती उत्तम असावी

  • दीड महिन्याच्या प्रशिक्षणानंतर वाहनचालकांची चाचणी घेण्यात येईल. त्यात उत्तीर्ण झालेल्यांना थेट जर्मनीत पाठवले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT