Maharashtra Cyclone Alert Saam TV News
Video

Cyclone News : महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकणार? पुढील ३६ तास महत्त्वाचे, अतिमुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Cyclone Alert : महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय, पुढील ३६ तासांत चक्रीवादळाची शक्यता. महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा.

Namdeo Kumbhar

Maharashtra Cyclone News : महाराष्ट्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, पुढील ३६ तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीस मनाई केली आहे. पूर आणि पाणी साचण्याची भीती असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, कर्नाटक आणि गोव्याच्या जवळ समुद्रात सायकलॉन सर्क्युलेशची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या ३६ तसांमध्ये ते अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे कोकण , मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार असल्याची माहिती मिळतेय. हे कमी दाबाचे क्षेत्र सायकलॉन सर्क्युलेशची स्थितीमुळे उत्तरेकडे तीव्र वेगाने सरकतंय. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच स्थितीमुळे मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास देखील प्रशासनाकडून मानाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train viral video: थरारक! ट्रेन पकडण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घातला, रेल्वे स्टेशनवरील धडकी भरवणारा VIDEO

धुळवडीनंतर धुरळा उडणार; ७ राज्यात निवडणुकीची घोषणा होणार, वाचा सविस्तर

Pune Holi: पुण्यात मोठी दुर्घटना! होळी सेलिब्रेशनदरम्यान लाईटचा गर्डर पडला; १६ जण गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या गोटमार यात्रेत अनेक जण गंभीर जखमी

Rajya Sabha Elections: भाजपकडून 9 उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाले तिकीट? वाचा यादी

SCROLL FOR NEXT