Maharashtra government employees Saam TV News
Video

Sangli News : मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ वाऱ्यावर! अडीच महिन्यांपासून ना नियुक्ती, ना वेतन

Maharashtra government employees : मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेतील १.२५ लाखांहून अधिक कर्मचारी नियुक्ती व थकीत वेतनासाठी संघर्ष करत आहेत. येत्या ५ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे.

Namdeo Kumbhar

लाडका भाऊ असणाऱ्या मुख्यमंत्री प्रशिक्षण कार्य योजनेतले कर्मचारी सध्या वाऱ्यावरच आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून देखील जिल्हा पातळीवरील कारभाऱ्यांकडून योजनेतल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबर वेतन देखील देण्यात येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने याची दखल घेऊन राज्यातल्या सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करून आडवणूक होणाऱ्या नियुक्त तातडीने करण्याबरोबर थकीत वेतन देण्यात यावं,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना कर्मचारी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

येत्या पाच जून पर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देखील तुकाराम बाबा महाराजांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांना देखील देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT