Maharashtra Assembly Election Satara Voting  Maharashtra Assembly Election Satara Voting
Video

Satara : हृदयद्रावक! ईव्हीएमचं बटन दाबताना हार्ट अॅटक, मतदान केंद्रावर मतदाराचा मृत्यू

Maharashtra Assembly Election Voting News : साताऱ्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. मतदान केंद्रावरच मतदाराचा हार्ट अॅटकने मृत्यू झालाय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election : साताऱ्यात(Satara) मतदान करताना मतदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. ईव्हीएमवर बटन दाबाताना हार्ट अॅटक आल्यामुळे मृत्यू झाल्याचं समजतेय. साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील मोरवे गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. मोरवे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा सकाळी मतदान केंद्रावर हार्टअॅटकमुळे मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात दुपारी मतदानाचा हक्क बजावतानाच मतदाराचा हार्टअॅटकमुळे मृत्यू झाला. शाम धायगुडे (६७ वर्षे) असे मतदाराचे नाव आहे. ६७ वर्षी धायगुडे मतदान करण्यासाठी ईव्हीएम मशीनजवळ गेल्यानंतर अचानक चक्कर आल्याने जागेवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं सांगितलं. या दुर्दैवी घटनेमुळे मोरवे गावातील मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

SCROLL FOR NEXT