Maharashtra Assembly Election Congress Party Survey Saam TV
Video

Maharashtra Politics : महाराष्ट्रात काँग्रेसच ठरणार सर्वात मोठा पक्ष; भाजपला मिळणार इतक्याच जागा? सर्व्हे आला समोर

Maharashtra Assembly Election Congress Party Survey : काँग्रेसने केलेला प्राथामिक सर्व्हे साम टीव्हीच्या हाती लागला आहे. या सर्व्हेत आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळताना दिसून येतंय.

Satish Daud

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून राज्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे केला जातोय. अशाच काँग्रेसने केलेला प्राथामिक सर्व्हे साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

या सर्व्हेत आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळताना दिसून येतंय. तर भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचं सर्व्हेत आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे दोन्ही गट (ठाकरे आणि शिंदे) यांना चौथ्या क्रमांकावरील जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सर्वात शेवटच्या क्रमांकावर राहू शकतो, असा अंदाज सर्व्हेत मांडण्यात आलाय.

महाराष्ट्रात कोणता पक्ष किती जागा जिंकणार?

  • सर्व्हेनुसार काँग्रेसला ८०-८५ जागा मिळण्याचा अंदाज

  • शरद पवारांच्या पक्षाला ५५-६० जागा मिळू शकतात.

  • उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ३०-३५ जागा मिळण्याचा अंदाज

  • सर्व्हेत भाजपला ६०-६२ जागा मिळण्याचा अंदाज

  • शिंदे गटाला ३०-३२ तर अजित पवारांच्या पक्षाला ८-९ जागा मिळण्याचा अंदाज

काँग्रेसच्या प्राथमिक सर्व्हेत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचं दिसून येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT