मुंबई : विधानसभा निवडणुकीने चांगलाच रंग पकडला आहे. विविध विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांकडून उमेदवारांचा प्रचार सुरु आहे. धारावीतही उमेदवारांचा प्रचार सुरु आहे. याचदरम्यान, धारावीत मोठा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धारावीत काँग्रेस-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडल्याची घटना घडली आहे.
धारावीत काँग्रेस आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना घडली आहे. प्रचार सुरू असताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर घोषणाबाजी करत धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देत खासदार वर्षा गायकवाड यांचे पती राजू गोडसे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे धारावीत तणावाचं वातावरण झाल असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.