Shinde Group  saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी निधी पुन्हा वळवला, संजय शिरसाटांचा बोलण्यास नकार, विचारता हात जोडले अन्...|VIDEO

No Funds for Shinde Ministers: मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांना अजित पवार हे निधी देत नसल्याची माहिती समोर आली होती.

Omkar Sonawane

मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या सामाजिक न्याय खात्याचा 410 कोटी निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असल्याची माहिती समोर आली होती. तसेच मागच्या महिन्यात देखील आदिवासी खात्याच्या निधीचा वापर लाडकी बहीण योजनेसाठी वापरला असल्याची माहिती माध्यमांमध्ये झळकली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना पुरेसा निधी देत नसल्याची खंत देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली होती. या सगळ्यावर आज मंत्री संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता संजय शिरसाटांनी काढता पाय घेतला. इतकंच नाही तर शिंदेच्या मंत्र्यांना निधी मिळतो का? असा सवाल केल्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमप्रतिनिधीना हात जोडले आणि आपल्या कार चालकाला चल रे अस म्हणत तेथून पळ काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच संघर्ष

ICE Facial : बर्फाच्या पाण्याने फेशिअल करताय? 'हे' ६ फायदे जाणून घ्या

Abhijeet Dipke : 'माझ्या अटकेची तयारी सुरू'; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SIR वरून वाद सुरू असतानाच आयोगाचा मोठा निर्णय; १७ राज्यांसाठी नवे आदेश

SCROLL FOR NEXT