Maharashtra Politics Saam tv
Video

Maharashtra Politics : गोरगरीब विद्यार्थ्यांची थट्टा; दादा कोंडके स्टाईल सरकारी गणवेशावरून विरोधक बरसले, पाह व्हिडिओ

School Uniform in Maharashtra : विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशावरुन सरकारवर टीका केलीये. एका विद्यार्थ्याचा शालेय पोशाखातील फोटो ट्वीट करत दानवेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. आमदार रोहीत पवारांनीही सरकारनं विद्यार्थ्यांची थट्टा केल्याचं म्हटलंय. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांसोबत शिक्षण विभागानं चेष्टा चालवली की काय असं चित्र आहे. सरकार कडून देण्यात येणाऱ्या गणवेशाची अवस्था पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. राणाभीमदेवी थाटात विद्यार्थ्यांना गणवेश देणार अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. पण ही घोषणा इतकी फुसकी आणि फसवी असेल अशी कल्पनाही या चिमुरड्यांनी केली नसेल. एकतर वेळत गणवेश मिळाले नाहीत.

जे मिळाले ते सुद्धा मापाचे नाहीत...छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी तर ढिगळ लावलेले, सैल, निकृष्ट दर्जाचे गणवेश आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही एका विद्यार्थ्याचा शालेय पोशाखातील फोटो ट्वीट करत सरकारवर घणाघाती टीका केलीये. हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्याचं दानवेंनी म्हटलंय. त्यानंतर आमदार रोहित पवारांनीही या गणेवशांवरून सरकारवर निशाणा साधलाय. मात्र यावर शिक्षणमंत्र्यांनी सारवासरव केली.

रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात या गणेवेशांवर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या खडाजंगीचा व्हिडिओच ट्विट केलाय.

छत्रपती संभाजीनगरात आणि आणखी काही जिल्ह्यात अर्ध शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले खरे पण दादा कोडकेंच्या वेशभूषेलाही लाजवेत असे हे गणवेश असल्यानं पालकांनीही संताप व्यक्त केला होता. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रकाशा बॅरेजची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू

Child Safety Alert : कफ सिरप प्यायल्याने ६ चिमुकल्यांचा मृत्यू; २ औषधांवर तात्काळ बंदी, धक्कादायक कारण समोर

Rakhi Sawant: 'डोनाल्ड ट्रम्प माझे खरे बाबा', आईनं शेवटच्या पत्रात लिहिलं होतं...; राखी सावंत पुन्हा बरळली

Chilli Burn Relief: हिरवी मिरची चिरल्यावर हात जळतात? 'हे' घरगुती सोपे उपाय करून आराम मिळवा

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

SCROLL FOR NEXT