PM Narendra Modi Saam Tv
Video

Maha Kumbh Mela 2025: हातात-गळ्यात रूद्राक्षांची माळ अन् मंत्राचा जप; PM मोदींनी त्रिवेणी संगमावर केलं स्नान, पाहा VIDEO

PM Narendra Modi: पीएम मोदींनी त्रिवेणी संगमावर गंगा स्नान केले. जवळपास अर्धा तास मोदींनी गंगा आरती करत गंगा नदीला वंदन केले. त्यांचा गंगास्नान करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजच्या दौऱ्यावर असून ते कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगास्नान केले. जवळपास अर्धा तास मोदींनी गंगा आरती करत गंगा नदीला वंदन केले. यावेळी पीएम मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत.

पीएम मोदी आज प्रयागराजच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी ते सकाळी प्रयागराज एअरपोर्टवर दाखल झाले. प्रयागराजवरून ते अरैल घाटावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बोटीने प्रवास करत ते त्रिवेणी संगमवर दाखल झाले. याठिकाणी त्यांनी गंगा नदीमध्ये स्नान करत अर्धा तास पूजा केली.

महाकुंभ सुरू झाल्यानंतर पीएम मोदींचा हा पहिलाच प्रयागराज दौरा आहे. पीएम मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एटीएस आणि एनएसजीसह इतर सुरक्षा पथकांनाही सतर्क करण्यात आले आहे. संगम परिसरात निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT