Laxman Hake alcohol test Saam TV
Video

Laxman Hake Video : लक्ष्मण हाकेंची ससून रुग्णालयात टेस्ट; डॉक्टरांनी काय अहवाल दिला?

Laxman Hake Latest News : लक्ष्मण हाके यांची पुण्यातील ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. प्राथमिक अहवालात हाके यांनी दारु पिलेली नव्हती, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.

Satish Daud

पुणे शहरात सोमवारी रात्री मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये मोठा राडा झाला. लक्ष्मण हाके यांनी मद्यपान केल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलं. त्यांची तातडीने अल्कोहोल टेस्ट करा, अशी मागणी देखील काही जणांनी केली. यावेळी हाके यांनी आपल्याला दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा आरोप काही जणांनी केला. भररस्त्यात सुरु असलेला या राड्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कोंढवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करत वाद मिटवला. दरम्यान, लक्ष्मण हाके यांची पुण्यातील ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. प्राथमिक अहवालात हाके यांनी दारु पिलेली नव्हती, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.

आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात. दुसरीकडे हाके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २० ते २५ मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. दुसरीकडे हाके यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT