Laxman Hake Clarifies on Viral Video Saam TV Marathi News
Video

Laxman Hake Video : बदनाम करण्याचा डाव, 'त्या' क्लिपवर हाकेंचं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं सांगितलं

Laxman Hake Clarifies on Viral Video : लक्ष्मण हाके यांच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ माजली आहे. हाके यांनी हे षडयंत्र असून ओबीसी आंदोलन बदनाम करण्याचा डाव असल्याचं स्पष्ट केलं.

Namdeo Kumbhar

Laxman Hake Viral Video : ओबीसी आंदोलन थांबावं यासाठी मला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र रचले असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. पैसे देण्या-घेण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आंदोलन काही केलं तरी थांबणार नाही. आम्हाला जेलमध्ये घाला आमच्या त्या व्हिडिओची ज्या काही यंत्रणा आहे त्यापासून चौकशी करा. मात्र ओबीसीचा लढा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल...

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिप मधील एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना सामाजिक कार्यात पेट्रोलसाठी आपण तुम्हाला पैसे देत असल्याचे सांगितले. यावर हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला. हाके यांनी आपण खात्यावर पैसे घेत नसल्याचे सांगितले. हाके यांच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पीएचडी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवारांचा पाठिंबा

भाजप नेत्याचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात, डोक्यात गोळी लागली अन् बाजूला पिस्तूल; नेमकं काय घडलं?

Video : तिरुपती मंदिरात १०० कोटींच्या चोरी प्रकरणात खळबळजनक खुलासा, CCTV फुटेजमध्ये चोरी करताना दिसला अधिकारी

IND vs PAK: भारतविरुद्ध पाकिस्तान हायव्होटेज सामन्याचा पुन्हा थरार रंगणार; कुठे फ्रीमध्ये पाहाल सामना?

Maharashtra Politics: शिवतीर्थावर ठाकरे-राणेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण, दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?VIDEO

SCROLL FOR NEXT