Laxman Hake addressing media during a fiery press conference targeting Deputy CM Ajit Pawar over OBC injustice and corruption allegations. Saam Tv
Video

अजित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले- ते महाजातीयवादी...VIDEO

Laxman Hake Slams Ajit Pawar: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर तीव्र शब्दांत टीका करत त्यांना “हरामखोर” नव्हे तर “दरोडेखोर” म्हटलं. वसतिगृह, फेलोशिप नाकारणं आणि २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला.

Omkar Sonawane

अजित पवार यांना आम्ही महाजातीयवादीच म्हणणार. त्याचा आम्हाला पश्चाताप वैगरे काही वाटत नाही. अजित पवार हे धुतल्या तांदळा सारखे नाहीत. 25 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ते कोणी साधू, संत नाहीत महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

अजित पवार यांनी ओबीसी मुलांसाठी वसतिगृह नाकारली त्यांची फिलोशीप नाकारली. आताच्या अधिवेशनात त्यांनी साखर कारखान्यांसाठी दोन हजार कोटींचा निधी मंजूर करून घेतला. महाराष्ट्राच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या दरोडा घालणारे तुम्ही दरोडेखोर आहात. त्यामुळे हरामखोर हा शब्द खूप सौम्य आहे.

तुम्हाला तर दरोडेखोर म्हटले पाहिजे. महाराष्ट्रातील वंचितांच्या सोशितांच्या आलुते बलुतेदारांच्या आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या टाळूवरच लोणी खाणारे तुम्ही दरोडेखोर आहात. त्यामुळे मला या गोष्टीचा पश्चाताप वाटत नाही. हो मी अजित पवार यांना हरामखोर म्हटले आहे. त्यांनी काय मला कायदेशीर नोटीस पाठवली ना तर मी बघून घेईन असे हाके यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FASTag Pass: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! ३००० रुपयांचा पास अन् वर्षभर मोफत प्रवास, या अ‍ॅपवर करता येणार अर्ज

Rajgira Ladoo Recipe : श्रावणात उपवासाला खास बनवा राजगिऱ्याचे लाडू, वाचा सिंपल रेसिपी

Rajinikanth-Coolie : रजनीकांतच्या चित्रपटासाठी सगळी कंपनीच बंद, कर्मचाऱ्यांना दिली मोफत तिकिटे

क्रिकेटविश्वात खळबळ! भारताच्या माजी क्रिकेटरला ईडीची नोटीस, आज चौकशी, नेमकं प्रकरण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी कोण? सासू, सून की जाऊबाई; लाडकी बहीण योजनेच्या लाभावरुन सासू-सुनांमध्ये महाभारत

SCROLL FOR NEXT