लातूर-तुळजापूर महामार्गावर तावशी ताड येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती शेतातून जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील जखमींना उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.