Latur SAAM TV
Video

Latur : लातूरमध्ये पुन्हा अतिमुसळधार पाऊस, आज शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

Maharashtra Rain Update : लातूर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो असून हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.तर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर जिल्हा हवामान विभागाने रेड अलर्ट दिलाय, तर जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतो आहे.आज दिवसभर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे, आणि त्याचा फटका काही भागांना बसला सुरुवात झाली आहे. अहमदपूर तालुक्यातल्या माकणी येथील पुलावरून पाणी आल्याने माकणी- चोबळी जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय, तर थोडगा येथे ही पुलावरून पाणी आल्याने देखील, थोडगा - मोघा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT