Latur Rain SAAM TV
Video

Latur : लातूरच्या ढोकी गावात मुसळधार पाऊस, घरांमध्ये पाणी, संसार उघड्यावर, भयानक परिस्थिती | VIDEO

Dhoki village flood : लातूरच्या ढोकी परिसरात देखील मध्यरात्री तुफान पाऊस झाला आहे. पावसामुळे गावातल्या काही घरांमध्ये पाण्याचे ढव साचून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर जिल्ह्यातील ढोकी परिसरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांचा संसार अक्षरश: पाण्यात तरंगताना दिसत आहे. काही घरांमध्ये पाण्याचे ढव साचल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. नागरिकांना तात्पुरता ग्रामपंचायत आणि मंदिरात आश्रय देण्यात आला आहे. रात्री अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वत्र परिसर पाण्याने भरुन गेला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुरंदर विमानतळाच्या जागा हस्तांतरण मार्ग मोकळा

Mumbra Railway Station : 'मुंब्रा' स्टेशनचे नाव अज्ञाताने अचानक बदलले, स्टेशनच्या फलकावर लावले दुसरे नाव

छगन भुजबळांचा कौतुकास्पद निर्णय, शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा, २८७ आमदारांनी घ्यावा आदर्श

Parbhani Heavy Rain : परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार; शेताला आले नदीचे स्वरूप, होत्याचं नव्हतं झाले

Korigad Fort History: ट्रेकिंग, निसर्ग आणि युद्धनीती; कोरीगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT