Lathi-Kathi Game SaamTv
Video

Pune News : महिलांच्या लाठी-काठीने वेधलं सर्वांच लक्ष !

Ganesh Visarjan 2024 : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे. या मिरवणुकीत महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक खेळणे सर्वांना आकर्षित केले.

Saam Tv

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आता चांगलाच उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच पुण्यातले मानाचे सगळे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत. शहरातल्या विविध चौकात बाप्पाच्या स्वागतासाठी पथक सज्ज झालेले आहेत. या मिरवणुकीत 2 महिला पारंपरिक मर्दानी खेळ समजला जाणारा लाठी-काठी या खेळाचं प्रात्यक्षिक सादर करताना दिसून आल्या. त्यांच्या या खेळाने मिरवणुकीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

मुंबईच्या पाठोपाठ आता पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत देखील रंगत आलेली दिसत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे. या गर्दीत एका पथकाच्या 2 महिलांनी सादर केलेल्या शिवकालीन पारंपरिक खेळाच्या प्रात्यक्षिकाने सगळ्यांना आकर्षित केले. या महिलांनी लाठी-काठी हा खेळाचा प्रकार अत्यंत सुबक पद्धतीने दाखवल्याने सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT