Ladki bahin yojana  saam tv
Video

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्चचे १५०० रुपये कधी मिळणार? VIDEO

Ladki Bahin Yojana February-March Installment : लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये अद्याप मिळालेले नाहीत. मात्र, आता सरकारनं त्यांना खूशखबरी दिलीय.

Nandkumar Joshi

राज्यातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. फेब्रुवारी संपून मार्च सुरू झाला. पण अद्याप फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसेच महिलांच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत. पण आता सरकारनं महिला दिनी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. पण मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. त्याचं उत्तरही तटकरे यांनी यावेळी दिलंय.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणार किंवा ही योजनाच बंद केली जाऊ शकते, असा आरोप होत आहे. त्यात फेब्रुवारीचा हप्ता अजून खात्यात जमा झाला नाही. त्यामुळं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्या चर्चांना आदिती तटकरे यांनी पूर्णविराम दिला आहे.

फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहोत. त्यासंबंधीच्या प्रक्रियेला ५ ते ६ तारखेपासून सुरुवात होईल. ८ तारखेच्या आत फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत, अशी माहितीही तटकरे यांनी दिली.

दुसरीकडे लाभार्थी लाखो महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याबाबत विचारणा केली असता, विरोधक सुरुवातीपासूनच आरोप करत आहेत, असं तटकरे म्हणाल्या. ही योजना अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या महिन्यात २ कोटी ३५ लाख महिलांना लाभ पोहोचला आहे. फेब्रुवारीत पण लाभार्थी संख्या त्याच प्रमाणात राहणार आहे. विरोधक सुरुवातीपासूनच आरोप करत आहेत. सुरुवातीपासूनच ही योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपते. या योजनेला मिळणारा प्रतिसाद बघता विरोधकांमध्ये नैराश्य आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार यापुढंही ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती तटकरेंनी दिली. मार्चचा हप्ता नेमका कधी मिळेल, याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्यावेळी विभागाकडून उपलब्ध केला जाईल, त्यावेळी तो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात होईल.

२१०० रुपये मिळणार का?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महिना १५०० रुपये दिले जातात. ते २१०० रुपये करण्यात येतील असं आश्वासन महायुतीच्या आणि सध्या सत्ते असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक काळात दिलं होतं. त्यामुळं २१०० रुपये मिळणार का, असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना पडला आहे. याबाबतही तटकरे यांनी माहिती दिली आहे. २१०० रुपये देण्यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. ही योजना आणि त्याचा निधी आमच्यापर्यंत येतो, तो महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. यासंदर्भातील यंत्रणा सक्षम करण्यावर आमचं अधिकाधिक लक्ष केंद्रीत आहे, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT