Ajit pawar on Ladki Bahin Yojana Update saam tv
Video

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, अजित पवारांनी दिले संकेत

Ladki Bahin Yojana Will Not Be Scrapped : लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांनी मोठे संकेत दिले आहेत. लाडकी बहीण योजना ही बंद करणार नाही, असे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

Nandkumar Joshi

Ladki Bahin Yojana Update News : लाडकी बहीण योजना बंद करणार, महायुती सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केली असे आरोप गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून होत आहेत. मात्र, आता अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करण्यात येईल, पण ही योजना बंद करणार नाही, असे अजित पवार यांनी विधानसभेतच सांगितले. ज्यांची नावे कमी करण्यात आली आहेत, त्यांच्याकडून लाभापोटी घेतलेले पैसे परत घेण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कधी कधी योजना येते, त्यात काही गोष्टी लक्षात आल्या तर दुरुस्ती करतो. आम्ही तशी दुरुस्ती करणार आहोत. ही योजना बंद करणार नाही. गरीब महिलांवर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे, त्यांना १०० टक्के देणारच, त्यात तसुभरही आम्ही कमी पडणार नाहीत, असेही अजित पवार यांनी ठामपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT